मित्राचा खून करून मृतदेह शिवारात टाकला
तळेगाव दाभाडे पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा
1 मिनिट वाचन

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : जुन्या वादातून एका व्यक्तीचा कोयता आणि काठीने मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (२२ नोव्हेंबर) तळेगाव दाभाडे परिसरातील ओझर्डे शिवारात घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश भगवान साळुंके (२३, सडवली, मावळ) आणि संदीप बाळू चव्हाण (२६, बऊरवाडी, मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. योगेश अरुण भांमरे (३६, सोमाटणे फाटा, मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी योगेश यांच्या पत्नीने सोमवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश भांमरे आणि आरोपी सिद्धेश हे मित्र आहेत. योगेश यांच्या मुलासाठी खरवस देण्याच्या बहाण्याने सिद्धेश याने उर्से येथे जाऊ असे सांगितले. त्यानुसार सिद्धेश याने त्याच्या दुचाकीवरून योगेश यांना उर्से येथे खरवस आणण्याच्या बहाण्याने नेले. त्यानंतर ओझर्डे शिवारात नेऊन एक महिन्यापूर्वीच्या वादातून त्यांच्यावर कोयता आणि काठीने हल्ला करत त्यांचा खून केला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




