मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

छठपूजेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात भाषिक वाद पेटवण्याचा प्रयत्न

राज ठाकरे यांचा घणाघात

सक
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

भाषिक वाद
राज ठाकरे

मुंबई : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर छठपूजा साजरी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावर काही राजकीय नेत्यांनी विरोधाची भूमिका घेतली असतानाच, मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर छठपूजेची गाणी वाजवण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक संघर्ष रंगू लागला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. छठपूजेचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाषिक वादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, गेल्या वर्षी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून गुजराती विरुद्ध मराठी असा वाद निर्माण करण्यात आला. भाजपला विकासकामांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर दोन समाजांमध्ये संघर्ष घडवून आणला जातो आणि त्या संघर्षातून निर्माण झालेल्या वातावरणाचा राजकीय फायदा घेतला जातो, अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणुकीतील विजयासाठी संघर्षाचे कारण पुढे केले जाते. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल कसा लागतो, यामागे निवडणूक आयोगाची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे राज ठाकरे यांनी सूचित केले.

राज ठाकरेंचा इशारा

छठपूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले, पूजेच्या नावाखाली कोणी सांस्कृतिक उन्माद घालण्याचा प्रयत्न करू नये.

उत्तर भारतीय आणि गुजराती समाजालाही राज ठाकरेंचा संदेश

या राजकीय वादात उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाला लक्ष्य करण्याऐवजी भाजपच्या राजकीय हेतूंकडे लक्ष देण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. उत्तर भारतीय आणि गुजराती समाजाने समजून घेतले पाहिजे की, त्यांना मराठी माणसाच्या विरोधात उभे करून काही राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. मात्र, या राजकारणाला बळी पडून कोणी महाराष्ट्राच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम लक्षात ठेवावेत, असा इशाराही त्यांनी दिला.

छठपूजेच्या आयोजनावरून सुरू झालेला वाद आता केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याला भाषिक आणि राजकीय रंग चढू लागला आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील मराठी विरुद्ध हिंदी वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा