कोल्हापूरपिंपरी चिंचवडपुणे

kohlapur News : स्वाभिमानीचे महामार्ग रोको आंदोलन ६१ तासांनंतर स्थगित

kohlapur News : उसाला ३,९०० रुपये पहिली उचल ; हंगामानंतर १०० आणि साखरेच्या दरानुसार आणखी २०० रुपये देण्याचा तोडगा

kohlapur News :कोल्हापूर: उसाच्या दरासाठी गेल्या ६१ तासांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर साखर कारखानदारांनी मांडलेला सुधारित दराचा प्रस्ताव संघटनेने स्वीकारला. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी किणी टोलनाक्यावर आंदोलक शेतकऱ्यांसमोर आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. यामुळे शनिवारी पुकारण्यात आलेला कोल्हापूर बंदही मागे घेण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ kohlapur News
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना उसासाठी सुधारित दर देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार पहिली उचल म्हणून प्रतिटन ३,९०० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. गळीत हंगाम पूर्ण झाल्यानंतर प्रतिटन आणखी १०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच साखरेला प्रतिटन ४,५०० रुपये दर मिळाल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त २०० रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना उसासाठी एकूण ४,२०० रुपयांपर्यंत दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.https://maharashtramirror.com/ kohlapur News
शेतकऱ्यांच्या संमतीनंतर आंदोलन स्थगित
बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती शिष्टमंडळाने किणी टोलनाक्यावरील आंदोलकांना दिली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर त्यांनी ६१ तासांपासून सुरू असलेले महामार्ग रोको आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
कोल्हापूर बंदही मागे
उसाच्या दराबाबत तोडगा निघाल्याने शनिवारी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंदही मागे घेण्यात आला आहे. आंदोलन स्थगित झाल्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button