Pune News : कोरेगाव पार्कमध्ये बंद फ्लॅट फोडून ३.३५ लाखांचे दागिने लंपास
Pune News : मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांचा घरात प्रवेश
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोरेगाव पार्क परिसरातील बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ नोव्हेंबरच्या रात्री ते ५ नोव्हेंबरच्या सकाळदरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी ५८ वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कोरेगाव पार्क येथील ओंकार हाइट्स, फ्लॅट क्र. सी-७ हा बंद होता. ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटले. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील १५ हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१ (३) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक झालेला नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत..https://maharashtramirror.com/ Pune News


