पुणेआरोग्यपिंपरी चिंचवडसोलापूर

Solapur News : सोलापुरात गैरहजर डॉक्टरांवर आरोग्यमंत्र्यांचा कारवाईचा बडगा; कामचुकारांना थेट घरी बसवण्याचा इशारा!

Solapur News : सोलापूर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार सुधारण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची अनुपस्थिती, प्रसूतीसाठी रुग्णांची होणारी हेळसांड आणि अत्यावश्यक औषधांचा अभाव अशा तक्रारी समोर आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शासकीय सेवेत राहून खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांना थेट सेवेतून कमी करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अशा डॉक्टरांच्या जागी नव्या तरुणांना संधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Solapur News

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर-सांगली आरोग्य जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. या बैठकीला खासदार ज्योती वाघमारे, उत्तमराव जानकर, आमदार अभिजित पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत ग्रामीण आरोग्य केंद्रांमधील अनियमिततेचे अनेक प्रकार समोर आले. वडाळा ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे १०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असतानाही वैद्यकीय अधिकारी अनेकदा गैरहजर असल्याची तक्रार जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी मांडली. पिंपळनेर येथील आरोग्य केंद्रातही संबंधित डॉक्टरांकडून अशाच प्रकारचे वर्तन होत असल्याकडे अण्णा ढोणे यांनी लक्ष वेधले. रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी उपचारासाठी कुणाकडे जायचे, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. डॉक्टर म्हणून काम करण्याऐवजी केवळ गणवेश घालून बसला आहात का, असा सवाल बैठकीत करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Solapur News

या तक्रारींची गंभीर दखल घेत आबिटकर यांनी गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय सेवेत असताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय बोगस डॉक्टरांविरोधात आठ दिवसांच्या आत विशेष मोहीम राबवून धडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आबिटकर यांनी यापूर्वी राज्यातील ७१० गैरहजर डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती दिली. त्यापैकी ४४२ डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून ५८ डॉक्टरांची सेवा समाप्त करण्यात आल्याचे त्यांनी विधानपरिषदेत सांगितले होते.

डायलेसिस सेंटरच्या प्रश्नावरही आरोग्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. संबंधित कंपनीचे केंद्राकडील दायित्व वाढले असून निधीसाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होण्यास विलंब झाला तरी रुग्णांची सेवा बंद पडता कामा नये, अशा सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत. राज्यात डायलेसिस सेवा सुरू असल्याचे सांगतानाच महालॅबच्या प्रलंबित बिलांसाठीही केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली. एकूणच, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमधील गैरहजेरी, औषधांचा तुटवडा आणि रुग्णसेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने आता कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गैरहजर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पुढील काळात कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button