पुणेठाणेपिंपरी चिंचवडमुंबईविशेषसामाजिक

Mumbai News : मुंबईकरांसाठी दिवाळीची मोठी भेट! नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू; अवघ्या ७० मिनिटांत कोकण गाठता येणार!

Mumbai News :मुंबई : मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळापर्यंत थेट विमानसेवा सुरू होणार असून, या मार्गावरील तिकीट बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ‘फ्लाय ९१’ (Fly91) या विमान कंपनीकडून ही सेवा चालवली जाणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून नियमित विमान उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

अवघ्या ७० मिनिटांत मुंबई ते कोकण!
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील प्रवाशांना आता कोकणात जाण्यासाठी रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) हा प्रवास अवघ्या ७० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. या नव्या सेवेमुळे मुंबई आणि कोकण यांच्यातील हवाई संपर्क अधिक मजबूत होणार असून, कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

काय असेल विमानाचे वेळापत्रक?
‘फ्लाय ९१’च्या नियोजित वेळापत्रकानुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी विमान उड्डाण करेल. हे विमान सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पोहोचेल.

कोकणवासीयांसाठी प्रवासाचा नवा पर्याय!
गणेशोत्सव, दिवाळी तसेच उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत थेट विमानसेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ वाचणार आहे. विशेषतः नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासीयांसाठी ही सेवा फायदेशीर ठरू शकते. एकूणच, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू झाल्याने कोकणच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच मुंबई आणि कोकणातील अंतरही अधिक जवळ येणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button