Pune News : एस.टी. महामंडळाच्या ‘एस.टी. संगे तीर्थाटन’ उपक्रम योजना; स्वारगेट आगाराकडून आकर्षक देवदर्शन सहलींचे आयोजन
Pune News :पुणे , महाराष्ट्र िमरर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) स्वारगेट आगाराच्या वतीने प्रवाशांसाठी ‘एस.टी. संगे तीर्थाटन’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या सहलींचे आयोजन करण्यात आले अाहे. या सहलींचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वारगेट आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी केले आहे. या विशेष सहलींचे वैशिष्ट म्हणजे, यामध्ये महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यामध्ये ५० टक्के सवलत (अर्धे तिकीट) मिळणार आहे. तसेच, वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची सवलत महामंडळाकडून देण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०२६ मध्ये नियोजित असलेल्या प्रमुख सहलींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
निळकंठ धाम दर्शन (गरुडेश्वर, सरदार वल्लभभाई पटेल स्मारक, निलकंठ धाम): १२ते १६नोव्हेंबर (०४ रात्र ०५ दिवस). बाळूमामा आदमापूर दर्शन (कोल्हापूर महालक्ष्मी, नरसोबाची वाडी, खिद्रापूरसह): १३ व १४ नोव्हेंबर आणि १७ ते १८ नोव्हेंबर. कोकण दर्शन (दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा किल्ला): १३ ते १४, १४ ते १५ आणि १५ ते १६ नोव्हेंबर. (०१ रात्र ०२ दिवस). महाकाल दर्शन (उज्जैन, ओमकारेश्वर, इंदूरसह): दिनांक १६ ते २१ नोव्हेंबर (०४ रात्र ०५ दिवस). बदामी हंपी दर्शन: दिनांक १९ ते २२ नोव्हेंबर आणि २७ ते ३० नोव्हेंबर (०३ रात्र ०४ दिवस). पाच ज्योतिर्लिंग दर्शन (औंढा नागनाथ, परळी वैजिनाथ, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर): दिनांक १९ ते २२नोव्हेंबर (०४ रात्र ०५ दिवस). साडेतीन शक्तीपीठ दर्शन (तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, सप्तशृंगी देवी वणी): दिनांक २३ते २७नोव्हेंबर. शेगाव दर्शन (शेगाव, माहूर, लोणार सरोवर): दिनांक २७ ते ०१डिसेंबर . अष्टविनायक दर्शन (शिवनेरी बसने): दिनांक २८ ते २९नोव्हेंबर (०१ रात्र ०२ दिवस). या सहलींबाबत अधिक माहितीसाठी व बुकिंगकरिता प्रवासी राजू सरकाळे (९९२३५६२५२४) किंवा संतोष सपकाळ (८१४९०२८००१) यांच्याशी संपर्क साधू शकतात.


