CRIME NEWS : डिलिव्हरी फ्रँचायझीच्या बहाण्याने ५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

पीडिताशी इंस्टाग्रामवरील जाहिरात आणि ई-मेलवरून संपर्क करण्यात आला
पिंपरी, CRIME NEWS: डुडुळगाव येथे एका व्यक्तीला इंस्टाग्राम आणि ई-मेलद्वारे डिलिव्हरी फ्रँचायझी देऊन मोठा फायदा करून देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ मे ते २२ जून दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली.CRIME NEWS

या प्रकरणात अतुल नामदेव वहिले (३८, रा. ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ कुमार, प्रियांका सिंग, ई-मेल आयडी आणि बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना इंस्टाग्रामवरील जाहिरात आणि ई-मेलवरून संपर्क करण्यात आला. आरोपींनी वेगवेगळे व्हॉट्सॲप मेसेज आणि व्हॉईस कॉल करून आम्ही डिलिव्हरी फ्रँचायझीमधून चांगला फायदा करून देतो असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून खोटी कागदपत्रे पाठवली आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ५ लाख २२ हजार ८३७ रुपये भरायला लावून फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS


