Crime News तेवीस वर्षानंतर हत्येचा उगवला सूड; चौघे अटकेत

पुणे ग्रामीण पोलिसआणि राजगड पोलिसांची संयुक्त कारवाई
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : भोर तालुक्यातील शिंदेवाडी परिसरातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खूनप्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, तेवीस वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.Crime News

मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी (दोघे रा. सदाशिव पेठ, पुणे) मियान गॅसुद्दीन शेख, संदीप बाबुलाल कोरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील मौजे शिंदेवाडी येथील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संजय बाबुराव कदम देशमुख (वय ४०) यांचा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने डोके, चेहरा आणि हातावर वार करून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.Crime News
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तपासात मंथन दिनेश वैद्य आणि सौरभ सागर परदेशी यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत हा खून मियान गॅसुद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कोरी यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपी संदीप कोरी याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Crime News
वडीलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खून
पोलिस तपासात उघड झाले की, मुख्य आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश वैद्य यांचा सन २००३ मध्ये संजय बाबुराव कदम देशमुख यांनी खून केला होता. त्याच हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने मंथन वैद्य आणि त्याच्या साथीदारांनी संजय देशमुख यांची हत्या केल्याची बाब तपासात समोर आली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलिस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Crime News


