क्राईम न्यूजपुणे

Pune Crime : ज्येष्ठांना लुटणारी टोळी जेरबंद; पंधरा लाखांचा ऐवज जप्त

Pune Crime : समर्थ पोलीस स्टेशनची कामगिरी

Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर : ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याकडील दागिने लुटणाऱ्या सराईतांच्या टोळीचा शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. शाकीर जाकीर तेली (वय २९, रा. कात्रज), मोसीन खान नुर खान (वय ३१), इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख (वय ५०, दोघे रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime

पॉवर हाऊस चौक ते भवानी पेठ दरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेची १४ जून २०२६ रोजी २५ ग्रॅम सोन्याची साखळी चोरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही टोळी जळगावची असून, ज्येष्ठांना एकटे गाठून हातचालखीने त्यांच्याकडील दागिने लुटून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार १ जुलै रोजी शाकीर तेली याला अटक करण्यात आली. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी मालधक्का चौक येथून मोसीन खान नुर खान, इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख यांना पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी सिंहगड रोड, काळेपडळ, वानवडी, बंडगार्डन, पिंपरी चिंचवड भागात गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण पंधरा लाख रूपये किमतीचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. समर्थ पोलिस अधिक तपास करत आहेत.https://maharashtramirror.com/ pune crime

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button