Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीतील पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीतील पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट सातारा आणि सोलापूरसाठी पुनीत बालन ग्रुप’कडून नउ हजार किट
पुणे, महाराष्ट्र मिरर
ashadhi Wari 2026 : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे नउ हजार कीट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे. सोलापूर आणि सातारा पोलिस दलासाठी कीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ( ashadhi wari 2026 balan group essential kits )

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. १५ ते १९ जुलै या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करणार आहे.लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या भागातून पालखीचे मार्गक्रमण होत असताना २७०० पुरुष पोलिस आणि ३०० महिला पोलिस बंदोबस्तासाठी असतात. त्यांच्यासाठी ३ हजार कीट उपलब्ध करुन देण्याची विनंती सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आली होती. Ashadhi Wari 2026

Warakari Death : वारकऱ्याचा चेंगराचेंगरीने नव्हे, तर हृदयविकाराने मृत्यू; पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण
पंढरपुरात होणाऱ्या आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील पालख्या येथे येत असतात. या पालख्यांसह वारकरी भाविकांबरोबरच विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर येणाऱ्या भक्तांचीही मोठी संख्या असते. या सर्वांच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात ६ हजार ५०० पुरुष पोलिस तर २००० महिला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. Ashadhi Wari 2026
त्यांनाही अशाच प्रकारच्या साहित्याचे किट उपलब्ध करुन देण्याची विनंती पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलासाठी सात हजार तर सातारा ग्रामीण पोलिस दलासाठी दोन हजार असे एकूण नउ हजार कीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. Ashadhi Wari 2026
Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोच्या भ्रष्टाचाराचा आका कोण ?
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
किटमधील वस्तू-
कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड. Ashadhi Wari 2026

“यंदा पालखीच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली आहे. पण अशाही परिस्थिती पोलिस बांधव हे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था बघण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. ही एकप्रकारे सेवाच असून ही सेवा करत असताना त्यांचीही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. मागील वर्षीही पोलिस बांधवांची या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली होती. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ही संधी मिळाली, याचं मनापासून समाधान आहे.”
– पुनीत बालन, युवा उद्योजक
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


