पुणे

PUNE NEWS : आषाढी वारीनिमित्त आरोग्यसेवा-सुविधांचा आढावा

आयुक्त संजय काटकर यांनी केले पुणे विभागातील तयारीचे पुनरावलोकन

निलेश राऊत
पुणे PUNE NEWS
: आषाढी वारीनिमित्त लाखो भाविकांना दर्जेदार, तत्पर आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आरोग्यसेवा आयुक्त संजय काटकर यांनी पुणे विभागातील वारी आरोग्यसेवांच्या तयारीचा आढावा घेतला.PUNE NEWS

या बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर, तसेच पंढरपूर परिसरात वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका सेवा, औषधसाठा, मनुष्यबळ आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेतला गेला. या वेळी आरोग्यसेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी विविध आरोग्य सुविधा व नियोजनाची माहिती सादर केली.PUNE NEWS

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि पंढरपूर येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी वारी आरोग्यसेवांचे सादरीकरण केले. बैठकीस विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक धूम, पुणे विभागाचे उपसंचालक भगवान पवार, तसेच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि १०८ रुग्णवाहिका सेवेचे प्रतिनिधी उपस्थित होते. वारी मार्गावरील आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी आरोग्यदूत म्हणू कार्य करीत वारकऱ्यांपर्यंत सक्रियपण पोहोचावे, असे काटकर यांनी सांगितले.PUNE NEWS

अशा असतील सुविधा

  • वारकऱ्यांना थकवा, पाय दुखणे, निर्जलीकरण, ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच वृद्धत्वाशी संबंधित आरोग्य समस्यांविषयी विशेष काळजी घेणे.
  • वारी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे.
  • संवादातून वारकऱ्यांची विचारपूस करून आवश्यक आरोग्यसेवा तत्काळ उपलब्ध करून देणे.

PUNE NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button