क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

येरवडा येथे बेकायदेशीर विदेशी दारूसह स्कॉर्पिओ जप्त, एकाला अटक

एकूण २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येरवडा भागातील शहादल बाबा चौक येथे एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून होणारी विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक पोलिसांनी रोखली असून, एकूण २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अशी झाली कारवाई
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जयंतीनिमित्त अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने दि. १४ एप्रिल २०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अंमलदार भिमराव कांबळे व अमोल वायाळ यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्रमांक: एम.एच. १४ एल.पी. ७४७४) नगर रोडच्या दिशेने विदेशी दारूची अवैध वाहतूक करत आहे.

या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत व त्यांच्या पथकाने केंद्रीय महाविद्यालय, शहादल बाबा चौक येथे सापळा रचला आणि संशयित गाडी शिताफीने अडवली.

आरोपी आणि जप्त मुद्देमाल
गाडीची झडती घेतली असता, डिक्कीमध्ये विविध ब्रँडची सुमारे २ लाख रुपयांची विदेशी दारू मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याचे नांव अंग्रेजसिंग पुरणसिंग गील (वय ३८ वर्षे, रा, रामनगर, बोपखेल, बुद्ध विहार जवळ) असे आहे. ताब्यात घेतलेल्या मुद्देमालात काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी, मोबाईल फोन यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत रु २३,३०,९७५ आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गित्ते, सपोनि मिथुन सावंत, सपोनि रविकांत नंदनवार आणि त्यांच्या तपास पथकातील कर्मचारी सहभागी होते.

Scorpio seized with illegal foreign liquor in Yerawada, one arrested

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button