पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Rain : पूरबाधित १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

Pimpri Chinchwad Rain : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये भोजन, आरोग्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध

पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर

Pimpri Chinchwad Rain : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी होऊ नये, यासाठी महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले आहे. ( pimpri chinchwad rain flood situation)

https://www.instagram.com/p/DacAcuZotOG

Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनीह शहरातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेताना पावसाचा जोर वाढत असताना शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची धोक्याची पातळी लक्षात घेऊन त्या भागातील नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देऊन पूरबाधितांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. कोणत्याही परिस्थितीत अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ( Pimpri Chinchwad Rain )

Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!

पूर निवारा केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधेसह पथके नेमली आहेत. त्यांनी पूरबाधितांची आरोग्य तपासणी करून आवश्यक प्राथमिक उपचार करावेत. भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सोयीसुविधांची कमतरता राहणार नाही, याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत. ( Pimpri Chinchwad Rain )

तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती लक्षात आल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले. ( Pimpri Chinchwad Rain )


विशेष लक्ष असणारे भाग

पिंपरी चिंचवड शहरातील नदीपात्रापासून जवळ असणाऱ्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख पंचशील नगर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर, बोपखेल, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव, लक्ष्मीनगर या भागांत पुराचे पाणी शिरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे. ( Pimpri Chinchwad Rain )

Maval : मावळ तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना; घरावर कोसळली दरड, एकाचा मृतदेह हाती


क्षेत्रीय कार्यालयनिहाय निवारा केंद्रांत असणाऱ्या पूरबाधितांची संख्या ( Pimpri Chinchwad Rain )
(आकडेवारी ६ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतची)
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय – ३०० नागरिक
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय – ६३० नागरिक
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय – ९५० नागरिक
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय – २१० नागरिक

Tanaji nagar flood. Chinchawad @pune

D.Y. Patil B-School Case : गोपनीय माहितीची चोरी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचाही संशय; आरोपी अमोल गावंडे दुबईत असल्याची माहिती

पुणे, महाराष्ट्र मिरर

D.Y. Patil B-School Case : ताथवडे येथील नामांकित ‘डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल’चे (D.Y. Patil B-School Case ) माजी संचालक अमोल आनंदराव गावंडे यांच्याविरुद्ध संस्थेच्या निधीतून तब्बल ४,९८,६६,०००$ रुपयांचा (सुमारे पावणेपाच कोटी) कथित अपहार केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक अपहारासोबतच संस्थेचा गोपनीय डेटा चोरणे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केल्याचाही त्यांच्यावर संशय आहे. (D.Y. Patil B-School Case 4 crore scam gavande)

संस्थेने केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण अहवालात अमोल गावंडे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करून हा मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. यानंतर संस्थेच्या वतीने अधिकृत तक्रार देण्यात आली होती. (D.Y. Patil B-School Case ) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झालेल्या अर्ज चौकशीनंतर ४ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा रीतसर नोंदविण्यात आला.(D.Y. Patil B-School Case )

Pimpri Chinchwad Rain : पूरबाधित १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

संशयित आरोपी अमोल गावंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३१६(४), ३१८(४), २४८, ३३६ व ३४०, तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम, २००० मधील कलम ४३, ६६ आणि ७२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (D.Y. Patil B-School Case )

Alandi Flood: इंद्रायणीने ओलांडली धोक्याची पातळी; २५० वारकरी अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासात सहभागी होण्यासाठी पोलिसांनी अमोल गावंडे यांना अनेकवेळा समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी पोलिसांच्या नोटिसीला दाद न देता सातत्याने चौकशीस अनुपस्थित राहणे पसंत केले. ते तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावंडे हे सध्या भारताबाहेर निघून गेले असून ते दुबई येथे वास्तव्यास असण्याची शक्यता आहे. (D.Y. Patil B-School Case )

या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. गावंडे यांनी हा आर्थिक गैरव्यवहार नेमका कसा केला, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा संपूर्ण शोध घेणे तसेच संस्थेचा चोरीला गेलेला गोपनीय डेटा परत मिळविणे या दृष्टीने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. (D.Y. Patil B-School Case )

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button