पुणे

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर पती-पत्नीला अटकपूर्व जामीन

Ravindra Dhangekar: बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील रज्जुलाल शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकर पती-पत्नीला मोठा दिलासा

पुणे, महाराष्ट्र मिरर

Ravindra Dhangekar : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील रज्जुलाल शेख आत्महत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने माजी आमदार तथा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने धंगेकर पती-पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे, तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी व मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. Ravindra Dhangekar and wife granted anticipatory bail

गुलटेकडी परिसरातील राहत्या घरी बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते तसेच सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या व्हिडिओ आणि चिठ्ठीमध्ये आर्थिक फसवणूक, थकीत रक्कम आणि मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचा उल्लेख करत त्यांनी धंगेकर पती-पत्नी आणि बाळा शेडगे यांच्यासह १४ जणांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. Ravindra Dhangekar

PMC : ‘भूमी ग्रीन’वर पुन्हा सत्तेचा वरदहस्त; ६ कोटी ८३ लाखांच्या विवादास्पद प्रस्तावाला बहुमताची मंजुरी!

रवींद्र धंगेकर यांच्यातर्फे बाजू मांडताना प्रसिद्ध वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की, खलील शेख यांच्या सुसाईड नोटमध्ये रवींद्र धंगेकरांचे नाव थेट नमूद नाही. तसेच धंगेकर यांच्या पत्नीने या प्रकल्पातील व्यावसायिक भागीदारी ऑगस्ट २०२५ मध्येच सोडली होती. धंगेकरांना या प्रकरणात नाहक गोवण्यात आले असून पोलीस त्यांच्या सहभागाचा कोणताही ठोस पुरावा न्यायालयात सादर करू शकले नाहीत, असा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने धंगेकर दामपत्याला अटकेपासून संरक्षण दिले.

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण समाप्त; केंद्र सरकारकडून मागण्या मान्य

तथापि, न्यायालयाने काही अटींवर हा जामीन मंजूर केला असून त्यांना नियमितपणे पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, मनसे नेते बाळा शेडगे यांना कोर्टाने दिलासा नाकारल्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईची शक्यता वाढली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Ravindra Dhangekar

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button