Mumbai news : एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळे फासले
Mumbai news : औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवरून संभाजी ब्रिगेड आक्रमक ; अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
Mumbai news : मुंबई, महाराष्ट्र मिरर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासून निषेध नोंदवला. या प्रकारामुळे एमपीएससी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
संभाजी ब्रिगेडने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करून औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी सरकार आणि आयोगाला इशारा देण्यात आला होता. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत संघटनेने हे आंदोलन केले.https://maharashtramirror.com/ Mumbai news
संघटनेचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे यांनी एमपीएससीच्या कारभारावर गंभीर आरोप करत अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या आंदोलनादरम्यान सचिव हरपाळकर यांना मारहाण केल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला आहे. या दाव्याबाबत एमपीएससी किंवा पोलिसांकडून स्वतंत्र अधिकृत माहिती समोर येणे आवश्यक आहे.
या प्रकरणात संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि मुंबई अध्यक्ष सुहास राणे सहभागी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी असल्याचेही जाहीर केले आहे.
दरम्यान, एमपीएससीच्या विविध परीक्षांतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून राज्यातील उमेदवारांमध्येही असंतोष आहे. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

