मुंबई

Mumbai Crime News : मलकापुर पीआरएसवर दलालीचा पर्दाफाश; दोन जण अटकेत, लाखोंच्या बोगस तिकीटांची उकल

•मध्य रेल्वेच्या सतर्कता पथकाची गोपनीय माहितीवरून कारवाई, स्थानिक एजंटसह अल्पवयीन मुलगा अडकला

मुंबई :- 22 मे 2025 रोजी मध्य रेल्वेच्या सतर्कता पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मलकापुर येथील प्रवासी आरक्षण कार्यालयात (PRS) धाड टाकली. या कारवाईत प्रवासी तिकीट दलालीत गुंतलेले दोन व्यक्ती पकडले गेले.

पथकाने तपासादरम्यान एका एसी तात्काळ तिकीटासह (मूल्य 3960 रुपये) दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांची ओळख स्थानिक दलाल संजय चांडक आणि त्याचा 17 वर्षीय सहयोगी प्रसाद काले अशी झाली. चौकशीत चांडकने मुंबईतील कुख्यात एजंट ‘ठाकूर’शी संबंध असल्याची कबुली दिली. ठाकूर हा संपूर्ण अवैध तिकीट नेटवर्कचा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील तपासात चांडकने व्हॉट्सॲपवर झालेली संवादाची माहिती दिली. त्यात त्याने मलकापुर येथून बुक केलेल्या एकूण 182 प्रवास-सह-आरक्षण (JCR) तिकीटांचे फोटो शेअर केल्याचे उघड झाले. यामध्ये 23 सक्रिय तिकीटे (मूल्य 1,61,535 रुपये) आणि 159 जुन्या तिकिटांचा समावेश (मूल्य 8,48,298 रुपये) असून एकूण किंमत सुमारे 10,09,833 रुपये इतकी आहे. ही सर्व तिकिटे अवैधपणे विक्रीसाठी बुक केल्याचे आरोपीने मान्य केले आहे.

आरपीएफ मलकापुरचे निरीक्षक यांनी दोघा आरोपींना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले असून, रेल्वे कायदा कलम 143 अंतर्गतप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित 23 तिकीटांना तत्काळ ब्लॉक करण्यात आले असून तपास सुरू आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button