पुणे

Pune News : नवरात्रीनिमित्त एसटी महामंडळाची ‘कोल्हार दर्शन’ एकदिवसीय सहल ; स्वारगेट आगाराचा उपक्रम प्रौढांसाठी १२००, तर महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी ८५० रुपये शुल्क

Pune News : पुणे : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आगाराकडून भाविकांसाठी ‘कोल्हार दर्शन’ या एकदिवसीय आध्यात्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी स्वारगेट बसस्थानकातून या सहलीचे प्रस्थान होणार असून, नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या सहलीसाठी प्रौढ प्रवाशांना १२०० रुपये, तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ८५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये चहा, उपवासाचे पदार्थ, पिण्याचे पाणी, पाण्याची बाटली आणि एक टोपी यांचा समावेश आहे. नवरात्रीच्या काळात भाविकांना धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

कोल्हार हे अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक गाव असून, येथील रेणुका देवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या दर्शनासाठी येथे भाविक येतात. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने या सहलीला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अधिक माहितीसाठी राजू (९९२३५६२५२४) किंवा संतोष (८१४९०२८००१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी स्वारगेट आगाराकडून करण्यात आले आहे. नवरात्रीनिमित्त आयोजित या सहलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button