पुणेक्राईम न्यूज

Pune Crime : पुण्यात MPSC विद्यार्थ्याचे अपहरण;पोलिसांच्या धडक कारवाईने टळला अनर्थ

Pune crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मैत्रिणीशी बोलत असल्याच्या संशयातून एमपीएसीची तयारी करणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाचे मध्यरात्री फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्रामबाग पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच या थराराचा अंत करत तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. https://maharashtramirror.com/ Pune Crime

प्रसाद सूर्यवंशी (वय २८) असे अपहरणातून सुटका करण्यात आलेल्या एमपीएससी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सागर रमेश बोराडे (वय ३२, हॉटेल व्यावसायिक, रा. वालचंदनगर) आणि किशोर बाळासाहेब सावंत (वय ३२, रा. दसूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी सागर बोराडे हा हॉटेल मालक असल्याची माहिती समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

नेमकी घटना कशी घडली?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील चिमण्या मारुती चौक आणि पेरूगेट पोलीस चौकीच्या हद्दीतून प्रसाद सूर्यवंशी याच्यावर हल्लेखोरांनी झडप घातली. प्रसाद हा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहत आहे. तो एका तरुणीशी बोलत असल्याच्या संशयावरुण तरुणीच्या बॉयफ्रेंड, जो की हॉटेल व्यावसायिक आहे, त्याने आपल्या साथीदारांसह येऊन प्रसादला बळजोरीने काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत (एमएच १२ ९६९६) कोंबले आणि पसार झाले.https://maharashtramirror.com/ Pune crime

मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. या अपहरणाची माहिती मिळताच नियंत्रण कक्षातून डायल ११२ द्वारे विश्रामबाग पोलीस ठाण्याला तात्काळ सतर्क करण्यात आले. पोलिसांनी कसलाही विलंब न करता शहरात तात्काळ नाकाबंदीचे आदेश दिले आणि संशयित वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांचे पथक आरोपींचा पाठलाग करत असताना, सिंहगड रोड परिसराच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींच्या गाडीला पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान घेराव घातला. घटनेची माहिती मिळाल्यापासून अवघ्या ५३ मिनिटांच्या आत, म्हणजेच रात्री १:२३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सिंहगड रोड परिसरातून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून प्रसाद सूर्यवंशी याची सुटका करण्यात यश मिळवले.

दोघे अटकेत, इतरांचा शोध सुरू


या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेल व्यावसायिक सागर बोराडे आणि त्याचा साथीदार किशोर सावंत यांना जागेवरच अटक केली. त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जण सामील असल्याची शक्यता असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध विश्रामबाग पोलीस घेत आहेत. मध्यरात्री घडलेल्या या थरार सत्रामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून एमपीएसी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button