Pune Traffic News : पुणेकरांना आज पर्यायी मार्गाचा वापर करा

प्रमुख रस्त्यांवरील वाहतूकीत मोठे बदल
पुणे, महाराष्ट्र मिरर Traffic News : विविध राजकीय पक्ष आणि संघटनेच्यावतीने गुरूवारी (दि.२३) शहरात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी काही प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.Pune Traffic News

दिल्लीतील जंतर – मंतरवर कॉकरोच पक्षाच्यावतीने सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असून, या घटनेचा विविध सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असून, या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी (दि.२३) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी काही प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
मोर्चाचा मार्ग –
लाल महाल – दारूवाला पूल – नरपतगिरी चौक – बोलाई माता मंदिर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (ससून हॉस्पिटल).
प्रभावित मार्ग –
गणेश रोड, केळकर रोड, शिवाजी रोड, नेहरू रोड,
पर्यायी मार्ग –
लक्ष्मी रोड : दारूवाला पूल – डुल्या मारुती मार्गे इच्छित स्थळी.
गणेश रोड : लाल महाल – फडके हौद
सूर्या हॉस्पिटल – 15 ऑगस्ट चौक मार्गे.
केळकर रोड : एबीसी चौक – फुटका बुरूज – सूर्या हॉस्पिटल मार्गे.
शिवाजी रोड : जंगली महाराज रोड,
नदीपात्र रोड व टिळक रोडचा वापर करावा.
नेहरू रोड : गणेश रोड किंवा बॅनर्जी चौक – नेहरू मेमोरियल मार्गे प्रवास करावा.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना गणेश रोडवरील संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शक्यतो हा मार्ग टाळावा, तसेच, पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


