पुणे

Pune News : दांडिया-गरब्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


Pune News :शहरात विविध ठिकाणी गरबा, दांडियाचे वर्ग; तरुणाईसह महिलांचाही उत्साह

Pune News :पुणे- शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दांडिया आणि गरब्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले असून, या वर्गांना सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुण-तरुणींसह महिला,नागरिक तसेच लहान मुलांचाही या प्रशिक्षण वर्गांमध्ये उत्साहाने सहभाग पाहायला मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन शहरातील विविध भागांत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळच्या सत्रात होणाऱ्या या वर्गांमध्ये पारंपरिक गरब्याच्या विविध स्टेप्स, दांडियाच्या तालबद्ध हालचाली तसेच समूह नृत्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
तरुणाईमध्ये या प्रशिक्षण वर्गांबाबत विशेष उत्साह असून, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्याचबरोबर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलेही आवडीने गरबा-दांडिया शिकत आहेत. त्यामुळे दांडिया-गरबा हा केवळ तरुणाईपुरता मर्यादित न राहता सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र आणणारा उत्सव ठरत आहे.

नवरात्रीच्या दिवसांत पारंपरिक वेशभूषेत गरबा आणि दांडिया खेळण्याची तयारी नागरिकांकडून सुरू आहे. संगीत, नृत्य आणि उत्साहाने शहरातील वातावरण भारून गेले असून, दांडिया-गरब्याच्या माध्यमातून सर्व वयोगटातील नागरिक एकत्र येत उत्सवाचा आनंद लुटत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.


“गरबा आणि दांडिया ही केवळ नृत्याची साधने नसून, आपल्या संस्कृतीचा आणि एकत्रित आनंदाचा उत्सव आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पारंपरिक गरबा-दांडियाचा आनंद आत्मविश्वासाने आणि उत्साहाने घेता यावा, यासाठी आम्ही विविध स्टेप्स, तालबद्ध हालचाली आणि ग्रुप फॉर्मेशनचे विशेष प्रशिक्षण देत आहोत. सर्व वयोगटातील नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हालाही मोठा आनंद होत आहे.”

— अंकुर शिंदे, फाउंडर, ए.एस. डान्स अकादमी-

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button