पुणेमहाराष्ट्र

TET : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंडला बिहारमधून जेरबंद

TET : नीट परीक्षा प्रकरणी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान टीईटीचा मास्टरमांइंडच्या आवळ्या मुसक्या

मुंबई, महाराष्ट्र मिरर

TET : दिल्लीमध्ये ‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असतानाच, महाराष्ट्रातील बहुचर्चित शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि दीर्घकाळ पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी बिजेंद्र गुप्ता याला पोलिसांनी बिहारमधून अटक केली असून, त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे.

ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणाच्या तपासासाठी देशपातळीवर व्यापक शोधमोहीम राबवली. बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये आरोपीच्या मागावर पोलिसांची पथके सक्रिय होती. अखेर बिहारमधील पटणा आणि समस्तीपूर परिसरात सखोल तपास करून पोलिसांनी मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ताच्या मुसक्या आवळल्या. tet 2026 paper leak mastermind bijendra gupta arrest

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण समाप्त; केंद्र सरकारकडून मागण्या मान्य

पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा समस्तीपूर (बिहार) येथील असलेला बिजेंद्र गुप्ता गेल्या २५ वर्षांपासून पेपरफुटीचे मोठे रॅकेट चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आलेले तीन संशयित आरोपी थेट बिजेंद्र गुप्ताच्या सांगण्यावरूनच काम करत होते. या पेपरफुटीचे धागेदोरे देशातील विविध राज्यांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांशी जोडले गेले असून, महाराष्ट्र पोलिसांकडून बिहार, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कसून चौकशी सुरू आहे. TET

PMC: अडीच कोटींचा चुराडा! जंगली महाराज रस्त्यावरील ‘ते’ मेकॅनिकल पार्किंग अखेर पाडणार

एका स्टिंग ऑपरेशनमध्ये बिजेंद्र गुप्ताबाबत अत्यंत गंभीर माहिती समोर आली आहे. त्याने २०२३ मधील ओडिशा कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा, बिहार लोकसेवा आयोग (BPSC) आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (MPPSC) यांच्याही परीक्षांचे पेपर बेकायदेशीरपणे फुटवल्याचा दावा केल्याचे उघडकीस आले आहे. TET

भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. दिल्ली आणि हरियाणा येथील काही व्यक्ती टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विक्रीसाठी मुंबईत येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.

Tech Mahindra : आजारी मुलीच्या संगोपनासाठी रजा घेतल्याने कर्मचाऱ्याला बडतर्फ; टेक महिंद्राच्या दुंडीगल कॅम्पसबाहेर तीव्र निदर्शने

त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील कोंगाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी आकाश , राजीव आणि धीरज या तिघांना आधीच अटक केली होती. त्यांच्या झडतीत टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त करण्यात आले होते. या तिघांच्या चौकशीतूनच मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ताचे नाव समोर आले असून, आता त्याच्या अटकेमुळे या रॅकेटमधील आणखी काही मोठे चेहरे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button