महाराष्ट्र

SPORTS : सीएनएस चॅम्पियन कनेक्टमध्ये सायना नेहवाल सहभागी

SPORTS - CNS Champion Connect मध्ये सायना नेहवाल

SPORTS : अमानोरा येथील स्कूलमध्ये, ऑलिम्पिकपटू सायना नेहवाल विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

SPORTS : अमानोरा येथील छत्रभुज नरसी स्कूल (सीएनएस)तर्फे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘सीएनएस चॅम्पियन कनेक्ट’ या विशेष उपक्रमाच्या पहिल्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ऑलिम्पिक पदक विजेती, पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेली आणि बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल यांची उपस्थिती. शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात सायना नेहवाल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी मुक्त संवाद साधणार असून त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातील अनुभवांची उजळणी करणार आहेत.

‘सीएनएस चॅम्पियन कनेक्ट’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्टतेची प्रेरणा जागविणारे एक प्रतिष्ठित व्यासपीठ आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना शाळेत आमंत्रित करून त्यांच्या यशामागील संघर्ष, शिस्त, नेतृत्वगुण आणि जिद्द यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर मानसिक कणखरपणा, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली आहे.(SPORTS)

Nerul Drugs Free : नेरूळमध्ये नशावर हल्ला! एसआयईएस कॉलेज व पोलीसांची जोशात रॅली, घोषणांनी थरारले रस्ते

या कार्यक्रमात सायना नेहवाल आणि छत्रभुज नरसी स्कूलचे अध्यक्ष श्री. सुजय जयराज यांच्यात विशेष ‘फायरसाईड कन्व्हर्सेशन’ अर्थात अनौपचारिक संवाद होणार आहे. या संवादामध्ये सायना आपल्या क्रीडा कारकिर्दीतील चढ-उतार, ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास, कठोर सराव, अपयशावर मात करण्याची मानसिक तयारी आणि यशामागील सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व याविषयी अनुभव कथन करणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरे मिळण्याचीही संधी या कार्यक्रमात उपलब्ध होणार आहे.(SPORTS)

सायना नेहवाल या भारतातील सर्वाधिक यशस्वी बॅडमिंटनपटूंपैकी एक मानल्या जातात. त्यांनी भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देत जागतिक क्रीडाक्षेत्रात देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास तरुणांसाठी आदर्श मानला जातो. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(SPORTS)

Baba Siddique Shot Dead | बाबा सिद्दिकी हत्या : लॉरेन्स बिश्नोई टोळीची कबुली

या उपक्रमाबद्दल बोलताना छत्रभुज नरसी स्कूलचे अध्यक्ष श्री. सुजय जयराज म्हणाले, “’सीएनएस चॅम्पियन कनेक्ट’ हा विद्यार्थ्यांसाठी प्रभावी आणि परस्परसंवादी अनुभव ठरेल, अशी आमची संकल्पना आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या व्यक्तींशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद घडवून आणणे आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून विद्यार्थ्यांना नवे ध्येय, नवी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अशा मोकळ्या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, चारित्र्य, आत्मविश्वास आणि आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती विकसित होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”(SPORTS)

Pune Crime News | विश्रांतवाडी, हडपसर, मुंढवा भागात रात्री घरफोडी करणारा चोरटा जेरबंद

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या छत्रभुज नरसी स्कूलचा हा उपक्रम शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना देणारा ठरणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या व्यक्तिमत्त्वांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून आणण्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारविश्वाचा विस्तार करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. ‘सीएनएस चॅम्पियन कनेक्ट’च्या पहिल्या पर्वात सायना नेहवाल यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणार असून, या उपक्रमातून भविष्यातही विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा शाळेचा मानस आहे.(SPORTS)

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button