Pune News : चाकणमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाची कठोर पावले
Pune News : रस्ते दुरुस्ती व अतिक्रमणे हटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे जिल्ह्यातील चाकण आणि औद्योगिक परिसरात दररोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून वाहनचालक व नागरिकांची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. चाकण परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवून त्या जागी तातडीने रस्ते, ड्रेनेज व आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे स्पष्ट आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News
जिल्हाधिकारी कार्यालयात चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि कोंडी निवारणाबाबत आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार बाबाजी काळे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. बैठकीत स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल आपल्या अडचणी मांडल्या.
३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याची मुदत
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणे, साइडपट्ट्यांची कामे, तसेच गाळ आणि कचरा हटवण्याची तातडीची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. १ सप्टेंबरपासून पुढील टप्प्यातील कामे सुरळीत सुरू व्हावीत, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतच्या प्राथमिक कामांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
आवश्यकता भासल्यास २४ तास काम
रस्त्याचे काम सुरू असताना त्यावरून सातत्याने वाहतूक सुरू राहिल्यास कामाच्या गुणवत्तेवर आणि वेगावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन गरजेनुसार पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून २४ तास काम करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यामुळे कामे वेगाने पूर्ण होऊन रस्ते लवकर वाहतुकीस खुले होतील.https://maharashtramirror.com/ Pune News
सांडपाणी व पार्किंग व्यवस्थेचे नियोजन
रस्त्यांव्यतिरिक्त चाकण परिसरातील सांडपाणी आणि पार्किंगच्या समस्येवरही बैठकीत चर्चा झाली. नैसर्गिक नाले व सांडपाण्याच्या अपूर्ण कामांमधील त्रुटी एका महिन्याच्या आत दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, औद्योगिक क्षेत्रातील वाहनांसाठी उपलब्ध पार्किंगच्या जागांचा सुस्पष्ट नकाशा तयार करून तो उद्योग, वाहनचालक व वाहतूकदारांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News
सर्वंकष सर्वेक्षणाचे आदेश
चाकण परिसरातील रस्ते, सांडपाणी वाहिनी, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या सर्वेक्षणात आढळणाऱ्या त्रुटींवर कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करून कोणताही विषय प्रलंबित ठेवू नये, असा कडक इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


