पुणे

Pune News : डेंग्यूच्या उपचारादरम्यान १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

वडील आणि बहीणही अतिदक्षता विभागात

Pune News कन्नड : तालुक्यातील करंजखेड परिसरातील सुराशेवाडी येथील १२ वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यूच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोहम सुभाष ससे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, सोहमचे वडील सुभाष ससे आणि बहीण सप्तशोरी यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सोहमचा मृतदेह तब्बल सहा दिवस रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवावा लागला. सोहमला तीव्र ताप आल्याने २ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्याला डेंग्यूचे निदान झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. उपचार सुरू असतानाच ४ सप्टेंबर रोजी सोहमचा मृत्यू झाला.https://maharashtramirror.com/ Pune News

याचदरम्यान सोहमचे वडील सुभाष ससे आणि बहीण सप्तशोरी यांची प्रकृतीही गंभीर झाल्याने त्यांना एमजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुटुंबातील तिघांचीही प्रकृती बिघडल्याने ससे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुराशेवाडी परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामविकास अधिकारी पंढरीनाथ मैंद आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून परिसरात कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News

८ सप्टेंबर रोजी सोहमचे वडील आणि बहिणीला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी करंजखेड येथे सोहमवर अंत्यसंस्कार करण्यात आले सोहम हा नेवपूर येथील जिल्हा परिषद शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. तो हुशार आणि मनमिळावू विद्यार्थी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अवघ्या १२व्या वर्षी डेंग्यूमुळे त्याचा मृत्यू झाल्याने सुराशेवाडी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button