मुंबई

Maharashtra Politics : “हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भाजपचा राजीनामा!” – टी राजा सिंह यांचा निर्णय

• “पक्ष सोडला, पण हिंदू धर्म आणि जनतेची सेवा कधीच सोडणार नाही”

ANI :- तेलंगाणातील भाजपचे आक्रमक आणि स्पष्टवक्ते आमदार टी राजा सिंह यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला असून, त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आहे. गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टी राजा सिंह यांची नाराजी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर असून, त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना आपला राजीनामा पत्राद्वारे पाठवला आहे.

प्रदेशाध्यक्षपदी एन. रामचंद्र राव यांची केलेली नियुक्ती चुकीच्या राजकीय गणितांवर आधारित असल्याचं टी राजा सिंह यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. “हा निर्णय वैयक्तिक स्वार्थातून प्रेरित असून, यामुळे हजारो कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

राजीनामा देताना त्यांनी भावनिक भाषेत स्पष्ट केलं की, “हा निर्णय वेदनादायी असला तरी आवश्यक होता. मी पक्ष विचारांवर नव्हे तर चुकीच्या नेतृत्वावर नाराज आहे.”

पक्षातून बाहेर पडताना टी राजा सिंह यांनी हिंदुत्वाशी असलेली निष्ठा अधोरेखित करत सांगितलं की, “हिंदू समाजासाठी आवाज उठवणं आणि त्यासाठी उभं राहणं, ही माझी सर्वोच्च जबाबदारी आहे. ती मी कधीच सोडणार नाही.”

तेलंगाणात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर असतानाही, नेतृत्वाच्या चुकीच्या निर्णयांनी ती संधी हातातून गेल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि बी.एल. संतोष यांना उद्देशून त्यांनी मागणी केली की, “पक्षाच्या निर्णयावर फेरविचार करावा.”

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button