मुंबई

Mumbai News : उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलविली तातडीची बैठक

Mumbai News : आमदारांना दिला सावध राहण्याचा इशारा

Mumbai News : मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असून ‘ऑपरेशन टायगर २’ ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
एका बाजूला पक्षातील संभाव्य फुटीचे सावट असतानाच, दुसऱ्या बाजूला पनवेलमधील खारघर येथे मतदारांशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुहेरी संकटामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News
खारघर सेक्टर १९ मधील एका झेरॉक्सच्या दुकानात बीएलओचे कोरे एसआरए (एसआयआर) फॉर्म्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या पनवेल महापालिकेतील गटनेत्या लीना गरड यांनी यावर गंभीर आरोप करत म्हटले की, विरोधकांची मते कमी करण्यासाठी आणि बोगस मतदार वाढवण्यासाठीच हा संपूर्ण गैरप्रकार सुरू असून ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या सर्व घडामोडींनंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने ‘मातोश्री’वर पनवेलमधील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक बोलावली. पक्षातील संभाव्य गळती आणि संशयास्पद घडामोडी रोखण्यासाठी ठाकरेंनी सर्व आमदारांना अत्यंत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
“कोणत्याही एजंटचा किंवा संशयास्पद व्यक्तीचा फोन आल्यास तो त्वरित रेकॉर्ड करा,” असा थेट आणि गुप्त आदेशच उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिला आहे. या संदर्भात माहिती देताना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी स्पष्ट केले की, शिंदे गटात गेलेले काही पदाधिकारी आणि एजंट्सकडून सातत्याने संपर्क साधण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, आमदारांमध्ये कोणतीही फूट पडणार नसून पक्षाचे वातावरण बिघडवण्यासाठी या केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. “जिना यहाँ, मरना यहाँ” अशी ठाम भूमिका मांडत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सावंत यांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button