मुंबई

Mumbai News : 17 वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; नैराश्याच्या विळख्यातून सुटका शोधताना आयुष्य संपवले

गोरेगावमधील 45 मजली टॉवरवरून उडी मारून घेतला अंत

मुंबई (गोरेगाव पू.) :– मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका उंच इमारतीवरून उडी मारून 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीने 45व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले.

‘कोणीही जबाबदार नाही’ — चिठ्ठीतून मनस्थितीचा उलगडा

पोलीस तपासात तिच्या शालेय बॅगेतून एक चिठ्ठी सापडली असून त्यात “हा माझा स्वतःचा निर्णय आहे, यासाठी कोणीही जबाबदार नाही” असे स्पष्ट शब्दात लिहिले होते. तिच्या आत्महत्येमागे कोणताही गुन्हेगारी हेतू नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून आरे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलगी गेल्या सहा वर्षांपासून नैराश्याशी झुंज देत होती. याआधीही आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. “सगळ्यांनाच शेवटी मरायचं आहे, मग आपण का जगतोय?” असे तिने एका सत्रात मानसोपचारतज्ज्ञांना विचारल्याचे समोर आले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button