क्राईम न्यूजपिंपरी चिंचवड

CRIME NEWS : चिंचवड येथे डॉक्टरने केला रुग्ण महिलेचा विनयभंग

चेतना हॉस्पिटलमधील डॉक्टरला अटक

पिंपरी CRIME NEWS: ऑपरेशन नंतर तपासणीच्या बहाण्याने अश्लील चाळे करणाऱ्या चेतना हॉस्पिटल मधील डॉक्टर धैर्यशील शेटक (वय २७, मूळगाव कोल्हापूर) याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.CRIME NEWS

संभाजीनगर, चिंचवड येथील चेतना हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी संबंधित महिला आठ जून रोजी ऍडमिट झाली होती. त्यानंतर तिच्यावर ११ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तपासणीकरिता आरोपी डॉक्टर हा जनरल वॉर्ड मध्ये नेहमी जात होता. रविवारी (१४ जून) डॉ. शेटक याने रुग्ण महिलेला तपासणीच्या बहाण्याने स्पर्श करताना अश्लील चाळे केले. महिलेने ही बाब कुटुंबियांना सांगितल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर शेटक याला अटक करण्यात आली आहे.

CRIME NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button