विमाननगरमध्ये खाजगी कचरा वाहतुकीला अभय?

नागरिकांचा कारवाई न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
निलेश राऊत
पुणे: पुणे महापालिकेच्या विमाननगर परिसरात खाजगी वाहनांद्वारे सुरू असलेल्या कचरा वाहतुकीच्या गंभीर प्रकाराबाबत थेट आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वडगावशेरी काँग्रेसचे अध्यक्ष करीम शेख यांनी लेखी तक्रार देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सचिन लडकत यांनी अलीकडेच खाजगी कचरा वाहतूक करणारे वाहन पकडले होते. मात्र, वाहन जप्त करूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. केवळ “वरिष्ठ स्तरावर कारवाई होईल” असे सांगून प्रकरण पुढे ढकलले जात असल्याने संबंधित वाहनांना अप्रत्यक्षपणे अभय दिले जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नगररोड क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर आयुक्तांकडे धाव घेण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आर्थिक व्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा संशयही करीम शेख यांनी व्यक्त केला आहे.
नियमांचे उघड उल्लंघन होत असताना कारवाई होत नसेल, तर प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर
कारवाई झाली पाहिजे. दरम्यान, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.” – करीम शेख, अध्यक्ष, काँग्रेस, वडगांवशेरी
Is private waste transportation safe in Vimannagar?


