पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना नोकरीत कायम करण्याची मागणी

सन २००७ पासून महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये १२, ४०० कंत्राटी कामगार आहेत
निलेश राऊत
पुणे: राज्यात मुंबई, ठाणे, कल्याण व नागपूर महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घेण्याबाबतचा ठराव करून तो सरकारकडून मंजूर करून घेतला. त्याप्रमाणे पुणे महापालिकेनेही तसा ठराव करून तो सरकारकडून मंजूर करून घ्यावा, अशी मागणी महापालिका कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यात करण्यात आली.

महापालिकेतील मान्यता प्राप्त कामगार संघटना असलेल्या कामगार युनियनच्या पुढाकारातून सफाई कंत्राटी कामगार मेळावा घेण्यात आला. संघटनेच्या श्रमिक भवन इमारतीमधील एकलव्य सभागृहात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस मुक्ता मनोहर होत्या. महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सन २००७ पासून तब्बल १२ हजार ४०० कंत्राटी कामगार कार्यरत आहेत, अशी माहिती मेळाव्यात देण्यात आली. मेळाव्याला त्यांच्यापैकी अनेकजण उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांना महापालिका रजा वेतन, घर भाडे भत्ता, सानुग्रह अनुदान वगळून वेतन देत होती. संघटनेने त्याविरोधात औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता
Demand to keep contractual workers in Pune Municipal Corporation in their jobs


