Pune News : पाणीपुरवठा विभागात पैसे घेऊन टेंडर दिली जातात का?”
Pune News राष्ट्रवादीचा पाणीपुरवठा निविदा प्रक्रियेतील मनमानी कारभारावर आरोप;ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेवर ‘नोटांचा’ पाऊस
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील निविदा प्रक्रियेत अधिकारी नियमांचा सोयीस्कर अर्थ लावून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी केला आहे. या कथित भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी परदेशी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन प्रतीकात्मक खोट्या नोटांची उधळत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेत आक्रमक भूमिका मांडली. https://maharashtramirror.com/ pune News
महत्त्वाच्या निविदांमध्ये निकषांची पायमल्ली?
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत काढण्यात आलेल्या PMC/WATER_SUPPLY/2026/185 आणि PMC/WATER_SUPPLY/2026/186 या दोन महत्त्वाच्या निविदांमध्ये निकषांची पायमल्ली झाली असून, मोजक्याच ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून नियम डावलण्यात आल्याचा दावा अमोल परदेशी यांच्याकडून करण्यात आला आहे. “पैसे घेऊन टेंडर दिली जातात का?” असा थेट सवाल करत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या आंदोलनामुळे महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कंत्राटदार आणि निविदा मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
निविदा प्रक्रियेतील धक्कादायक बाबी समोर
एकाच स्वरूपाच्या कामासाठी काढलेल्या एका निविदेमध्ये बीएसके कन्स्ट्रक्शन या कंपनीला पात्र ठरवले जाते, तर दुसऱ्या निविदेत “कामाचा अनुभव नाही” असे कारण देत परस्पर अपात्र ठरवले जाते. नियमांचा असा दुजाभाव का? असा सवाल उपस्थित झाला आहे. प्रज्वल एन्टरप्रायजेस या कंपनीला ‘बिड कॅपॅसिटी’च्या मुद्द्यावरून अपात्र ठरवण्यात आले असून, यातही तांत्रिक निकषांचा सोयीस्कर अर्थ लावला गेल्याचे पाहायला मिळत आहे.तर आयकॉन एन्टरप्रायजेस / आयकॉन इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये नावाबाबत मोठी तफावत आढळली आहे. तसेच, कंपनीच्या सीए प्रमाणपत्रात १०० लाख रुपयांची चालू कामे दाखवलेली असताना, अंतिम गणनेत ती शून्य दाखवण्यात आल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र शंका उपस्थित होत आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
ही केवळ कागदपत्रांमधील साधी विसंगती नसून, निविदा प्रक्रियेत काही ठराविक ठेकेदारांना अनुचित लाभ पोहोचवण्यासाठी चालवलेला हा खेळ असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पात्र ठेकेदारांवर अन्याय करून मोजक्या ठेकेदारांची पाठराखण केली जात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पुणे महानगरपालिकेच्या कारभारातील पारदर्शकता टिकवण्यासाठी आणि जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वादग्रस्त ठरलेल्या दोन्ही निविदा प्रक्रियेची तातडीने आणि सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशीदरम्यान काही अनियमितता किंवा फेरफार आढळल्यास तत्काळ सदर निविदा रद्द करून नव्याने फेरनिविदा काढण्यात याव्यात तसेच, या संपूर्ण प्रकरणास जबाबदार असणारे दोषी अधिकारी आणि संबंधितांवर प्रशासकीय व कायदेशीर पातळीवर कठोर कारवाई करावी आणि पुणेकरांच्या कष्टाच्या पैशांचा हिशोब पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने मांडण्यात यावयात, अशा मागण्या यावेळी राष्ट्रवादी नेते अमोल परदेशी यांनी केल्या आहेत.या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात हा राजकीय वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News


