पुणेमहाराष्ट्र

पी एम पी एम एल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या वाहनाला अपघात

सुरक्षारक्षक व चालक गंभीर जखमी, आव्हाड यांना मुका मार

पुणे: पी एम पी एम एल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड त्यांच्या गाडीचा मुंबईहून पुण्याकडे येताना गुरुवार (ता. ७ मे) रोजी मळवली येथे भीषण अपघात झाला. त्यांचे बॉडीगार्ड आणि चालक गंभीर जखमी असून सुदैवाने आव्हाड यांना मुका मार लागला आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “नशीब बलवतर म्हणून वाचलो,” असे आव्हाड यांनी सांगितले.

ते म्हणाले, “मोबाईल मिनी व्हॅनच्या चालकाने बेशिस्तपणे रस्त्यातच यू टर्न घेतल्यामुळे हा अपघात घडला. यात आमचा चालक आणि बॉडीगार्ड दोघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मलाही थोडा मुका मार लागला आहे. गाडीची अवस्था खूप खराब झाली आहे.”

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button