दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी

९४.९६ टक्के मुली आणि ९०.५६ टक्के मुले पास; राज्यात दहावीचा निकाल ९२.०९ टक्के; गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल २ टक्क्यांनी घसरला
निलेश राऊत
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या (एसएससी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल शुक्रवार (दि.८) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. राज्यातून दहावीच्या निकालात ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर, मुलांची ९०.५६ टक्केवारी आहे. यंदा दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर च कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून, त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे.
राज्यात ६ हजार ६१२ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ४ लाख ८२ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे.
विभागनिहाय टक्केवारी
कोकण:९७.६२ टक्के; पुणे: ९४.२४ टक्के; नागपूर: ८९.०७ टक्के; मुंबई: ९४.९७ टक्के; कोल्हापूर: ९५.४७ टक्के; अमरावती: ९०.५० टक्के; नाशिक: ९०.५३ टक्के; लातूर: ८८.४२ टक्के; छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के
राज्यात एकूण ४०२ कॉपीचे प्रकार
राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ८२ कॉपीचे प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ७१ अमरावती ६७, नागपूर ४६, मुंबई ४४ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत तर, लातूर आणि पुण्यात ४२ तसेच कोल्हापूर आणि कोकण विभागात ४ प्रकरणे समोर आली आहेत.
१०वी चा निकाल कुठे पाहाल?
विद्यार्थ्यांना आपला निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
- https://results.digilocker.gov.in
- https://mahahsscboard.in
3. https://sscresult.mkcl.org
- राज्यातील ६६१२ शाळांचा निकाल १०० टक्के
दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्रातील २३,६९८ माध्यमिक शाळांतून १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६,६१२ शाळांचा निकाल १००% लागला आहे.
* राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,२२,८५१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,८२,२६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,८०,४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १,३४,९३४ उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
- गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून यासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे विहित शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहे.
- २० विषयांचा निकाल १००% टक्के
माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ करीता एकूण ६४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २० विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
- दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२२
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण १०,०३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,९१२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९,०४२ दिव्यांग विद्यार्थी उत्तोर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२२ आहे.
- पुनर्परिक्षार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी ३३.७९%
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५१८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २८,८६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३३.७९ आहे.
- खाजगी विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३%
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५०६ खाजगी विद्याथ्यर्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८,८२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी २२,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३ आहे.


