Pune crime: पर्वती येथे ज्येष्ठ नागरिकाची २७ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक
Pune Crime पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune crime: पुणे, महाराष्ट्र मिरर : सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणुकीचे जाळे पसरवले असून पुण्यात एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध कारणांचा बहाणा करून भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल २७ लाख २० हजार रुपये उकळले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईलधारक आणि बँक खातेदारांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर क्र. २ येथे राहणाऱ्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी १३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अज्ञात मोबाईलधारकांनी संपर्क साधला. भामट्यांनी विविध कारणे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘बँक ऑफ इंडिया’मधील ‘पदमावती एंटरप्रायझेस’च्या नावावर असलेल्या बँक खात्यावर फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. आरोपींच्या जाळ्यात अडकल्यामुळे फिर्यादी यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवले. https://maharashtramirror.com/ Pune crime
अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादी यांची एकूण २७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २०४, ३१८ (४), ३१९ (२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.https://maharashtramirror.com/ pune crime
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर करत आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन आमिषांना किंवा अनोळखी फोन कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

