CRIME NEWS : वडकीनाला येथे पिस्टलसह फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; गावठी पिस्टल जप्त

दिवेघाट पायथा परिसरात थांबला होता संशयित
पुणे CRIME NEWS: फुरसुंगी पोलिसांनी वडकीनाला परिसरात कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून फिरणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक पिस्टल व मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.CRIME NEWS

अटक करण्यात आलेल्यांची नावे आदेश आत्माराम काळे (वय २०, रा. ता. पुरंदर) आणि अजय बाळासाहेब साबळे (वय ३०, रा. वडकीनाला) अशी आहेत.CRIME NEWS
याप्रकरणी पोलीस अंमलदार हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
गुप्त बातमीदाराने दिली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी रात्री फुरसुंगी पोलीस ठाण्याचे तपास पथक नियमित गस्त घालत असताना सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडकीनाला येथील पालखी विसावा परिसरात पोहोचले होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कामथे आणि पोलीस हवालदार गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दिवेघाट पायथा परिसरातील महालक्ष्मी प्लॉटिंग येथील मोकळ्या जागेत दोन संशयित व्यक्ती थांबल्या असून त्यापैकी एकाच्या कमरेला गावठी पिस्टल आहे.CRIME NEWS
माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आदेश काळे याच्या ट्रॅक पॅन्टच्या आतील बाजूस एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझीन आढळून आले.
पिस्टलबाबत चौकशी केली असता आदेश काळे याने ते शस्त्र अजय साबळे याचे असल्याचे सांगितले. पुढील तपासात अजय साबळे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.CRIME NEWS
या कारवाईनंतर पोलिसांनी पिस्टल जप्त करून दोघांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे करीत आहेत.
फुरसुंगी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
CRIME NEWS


