डाबरकडून औषधी वनस्पती ‘पुदिना’च्या फायद्यांचा प्रचार

कडक उन्हाळ्यात मानवी पोटासाठी अत्यंत लाभदायक
महाराष्ट्र मिरर
पुणे: आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुर्वेद औषधे उत्पादक कंपनी ‘डाबर इंडिया लिमिटेड’ने पुदिन्याला एक ‘अद्भुत औषधी वनस्पती’ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. पुदिना अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध असून, विशेषतः कडक उन्हाळ्यात मानवी पोटासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत डाबर इंडिया लिमिटेडचे संचालक श्रीराम पद्मनाभन म्हणाले, “जीवनशैली आणि कामकाजाच्या बदलत्या पद्धतींमुळे आजचे ग्राहक सतत अनेक कामे एकाच वेळी करत असतात. त्यामुळे त्यांना प्रभावी आणि नैसर्गिक उपायांची गरज असते. सध्या उष्णतेच्या लाटा आणि वाढत्या तापमानामुळे उन्हाळ्यात आरोग्याच्या समस्या सातत्याने वाढताना दिसत आहेत. या वाढत्या हंगामी आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून डाबरने दिवसभर उन्हात राहणाऱ्या आणि उन्हाळ्यातील सामान्य आजारांना बळी पडणाऱ्या लोकांसाठी पुदिनाच्या वापराचा प्रचार सुरू केला आहे.
अनेक आजारांवरील उत्तम उपाय आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये
“आधुनिक काळातील अनेक आजारांवरील उत्तम उपाय आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये दडलेले आहेत. पुदिन्याचा इतिहास सुमारे ३,००० वर्षांपूर्वीचा असून त्याला ‘अद्भुत औषधी वनस्पती’ म्हणून ओळखले जाते, जी मानवी पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पुदिन्यामधील मेंथॉल पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स सक्रिय करते, पोटातील स्नायूंना आराम देते आणि अपचन व पोटदुखीचा त्रास कमी करण्यास मदत करते. तसेच अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्यांवरही ते प्रभावी मानले जाते,” असे डॉ. निकिता जगताप यांनी यावेळी सांगितले.
पुदीन हरा विषयी
डाबर पुदीन हरामध्ये मुख्य घटक म्हणून पुदिना सत्वाचा समावेश असून ते अपचन, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांवर जलद आणि प्रभावी आराम देण्यासाठी ओळखले जाते. १००% नैसर्गिक घटकांनी युक्त असलेले पुदीन हरा हे सुरक्षित आणि विश्वासार्ह उपाय मानले जाते. असेही यावेळी पद्मनाभन यांनी सांगितले.
पुणे न्युज


