पुणे

PMC Road News : भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पंचवीस कोटींच्या रस्ते कामांच्या निविदा वाटून घेतल्या

काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांचा आरोप; महापौरांसह दोन आमदारांच्या समर्थकांचा सहभाग

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC Road News : महापालिकेच्या सुमारे पंचवीस कोटी रुपयांच्या तीन रस्ते कामांच्या निविदांवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निविदा भाजपच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या पद्धतीने वाटून घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणात महापौरांसह कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील दोन आमदारांच्या समर्थकांचा निविदा प्रक्रियेत सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.PMC Road News

अरविंद शिंदे यांनी सांगितले की, या निविदांबाबत २६ जुलै रोजी महापौर बंगल्यावर बैठक झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. महापालिकेचे अधिकरी टक्केवारी घेउन कामे करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. तीन निविदांपैकी दोन निविदा आपापसात वाटून घेण्यात आल्याचा, तर तिसऱ्या निविदेवरून संबंधितांमध्ये वाद सुरू झाल्याचा दावाही शिंदे यांनी केला.PMC Road News

कोथरूड आणि मुंढवा पूलाशी संबंधित कामासाठी एकाच ठेकेदाराला कामं देण्यात येत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. त्यामुळे आयुक्तांना भेटून या तीनही निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी आम्ही केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या ठेकेदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अधिकारी काम करत आहेत. तसेच, टक्केवारीचे व्यवहार होत असतील आणि अधिकारीच कामात सहभागी असतील, तर कोणत्याही कामाला नकार दिला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.PMC Road News

दरम्यान, या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करून २५ कोटींच्या तिन्ही निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.PMC Road News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button