Pune News : ‘एस.टी. संगे तीर्थाटन’ : स्वारगेट आगारातर्फे धार्मिक व पर्यटन सहलींचे आयोजन
Pune News : ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिररः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) स्वारगेट आगाराकडून प्रवाशांसाठी ‘एस.टी. संगे तीर्थाटन’ ही विशेष योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीत तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी या सहलींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात विविध पर्यटन व धार्मिक स्थळांच्या सहली आयोजित करण्यात आल्या आहेत.
• एक दिवसीय सहली: कासपठार व ठोसेघर (२, ४ व ७ ऑक्टोबर), सज्जनगड दर्शन (३ ऑक्टोबर), शिवथरघळ (४ व १० ऑक्टोबर) आणि गोंदवले दर्शन (२४ सप्टेंबर, ४ व २४ ऑक्टोबर).
• दोन दिवसीय सहली: कोकण दर्शन – दिवेआगार, हरिहरेश्वर (२ ऑक्टोबर), अष्टविनायक दर्शन (२४ ते २५ ऑक्टोबर), गाणगापूर, तुळजापूर व अक्कलकोट (२८ ते २९ ऑक्टोबर) आणि बाळूमामा आदमापूर, कोल्हापूर (३० ते ३१ ऑक्टोबर).
• दीर्घकालीन सहली (४ रात्री, ५ दिवस): शेगाव, माहूर व लोणार (२२ व २६ ऑक्टोबर), महाकाल दर्शन – उज्जैन, ओंकारेश्वर (२९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) आणि निळकंठ धाम, गरुडेश्वर – गुजरात (१२ ते १६ नोव्हेंबर).
• या सहलींच्या अधिक माहितीसाठी व पूर्वआरक्षणासाठी राजू सरकाळे (९९२३५६२५२४) किंवा संतोष सपकाळ (८९४९०२८००१) यांच्याशी संपर्क साधावा.


