मुंबई

Mumbai News : ‘सायबर फसवणुकीच्या पैशांनी अ‍ॅपल-सॅमसंगचे फोन्स खरेदी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; एलटी मार्ग पोलिसांची अहमदाबाद, कुर्ल्यात धडक कारवाई!’

Mumbai News : मुंबई :– जवळपास 20 लाखांचे 25 हाय-एंड स्मार्टफोन्स जप्त; क्रेडिट कार्डची लिंक पाठवून 4.5 लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश’ मुंबई :- क्रेडिट कार्डची सर्व्हिस बंद करण्याच्या बहाण्याने मुंबईकरांना गंडा घालणाऱ्या आणि फसवणुकीच्या पैशांमधून महागडे स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्या एका भामट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबईतील लोकमान्य टिळक (एल. टी.) मार्ग पोलिसांनी शिताफीने पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपासाचा माग काढत पोलिसांनी मुंबईतील कुर्ला आणि थेट अहमदाबाद (गुजरात) येथून टोळीतील दोन सराईत सायबर गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.पोलीस कारवाईत या भामट्यांकडून अ‍ॅपल, सॅमसंग, गुगल, व्हिव्हो या कंपन्यांचे 19 लाख 66 हजार 75 रुपये किमतीचे 25 महागडे मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News

‘आरबीएल क्रेडिट कार्डच्या नावाने बनावट लिंक अन् 4.48 लाखांची ऑनलाईन खरेदी’

एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (क), 66 (ड) अंतर्गत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदाराला एका अज्ञाताने फोन करून तो ‘आरबीएल (RBL) क्रेडिट कार्ड’ विभागातून बोलत असल्याचे भासवले. क्रेडिट कार्डवरील ‘मेल ऑर्डर (M.O.)’ सर्व्हिस बंद करायची असल्याचे सांगून भामट्याने तक्रारदाराच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक बनावट लिंक पाठवली.https://maharashtramirror.com/ Mumbai news

तक्रारदाराने ती लिंक ओपन करताच, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ‘स्विगी’ प्लॅटफॉर्मवर 3 ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल 4 लाख 48 हजार 721 रुपयांची ऑनलाईन खरेदी करून मोठा आर्थिक गंडा घातला होता.

अहमदाबाद आणि कुर्ल्यात छापे; दोन अट्टल आरोपी गजाआड

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून एल. टी. मार्ग पोलिसांच्या सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सखोल तांत्रिक विश्लेषण सुरू केले. तपासाचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी कुर्ला (मुंबई) आणि अहमदाबाद (गुजरात) येथे छापे टाकून दोन्ही मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

अनिसबेग समिरबेग मिर्झा (वय 23)

मोईन रहिम शेख (वय 34)

तपासादरम्यान, आरोपींनी दाखल गुन्ह्यातील पैशांमधून खरेदी केलेले अ‍ॅपल (Apple) कंपनीचे 2 मोबाईल आणि इतर सायबर गुन्ह्यांमधून खरेदी केलेले अ‍ॅपल, सॅमसंग, गुगल, व्हिव्हो कंपन्यांचे 23 मोबाईल असे एकूण 25 हाय-एंड स्मार्टफोन्स पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

‘वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगिरी’

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (दक्षिण परिमंडळ 02) श्रीमती रागसुधा आर. आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (पायधुनी विभाग) श्रीमती रेणूका बुवा यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.

एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दंडवते, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सायबर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय मेटकरी, सतिश बडे, अमोल गोगावले, तसेच पोलीस अंमलदार अविनाश पाटील, संतोष कचरे, निलेश झगडे, अमोल जगदाळे, प्रफुल्ल पाटील, सागर विचारे आणि जगदेव यांनी या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button