मुंबई

Mumbai News : बिग बॉस 20’चा धमाकेदार प्रोमो रिलीज स्पर्धकांच्या नावांबाबत उत्सुकता वाढली

Mumbai News : मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि कायम चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या आगामी २०व्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची उत्सुकता आता आणखी वाढली असून, निर्मात्यांनी ‘बिग बॉस 20’चा अधिकृत प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमधून नव्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
‘बिग बॉस 20’च्या नव्या सीझनमध्ये अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रोमोमध्ये सलमानचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. ‘करण अर्जुन’ चित्रपटातील लूकची झलक देत सलमान घोड्याला पकडताना दिसतो. यावेळी तो आपल्या खास शैलीत, ‘जे करण अर्जुनमध्ये घडलं, ते पुन्हा घडणार… तथास्तू’, असा संवाद म्हणताना दिसतो.https://maharashtramirror.com/ Mumbai News
सलमान खानच्या या हटके अंदाजामुळे ‘बिग बॉस 20’च्या प्रोमोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रोमो समोर आल्यानंतर चाहत्यांकडूनही त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नव्या सीझनमध्ये नेमका कोणता ट्विस्ट असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
‘बिग बॉस 20’चा नवा सीझन ६ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो रात्री ९ वाजता JioHotstar वर, तर रात्री १०.३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 20’मध्ये उर्फी जावेद, फैसल शेख आणि अंजली अरोरा यांच्यासह काही चर्चेत असलेली नावे सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी घरात प्रवेश करणार आणि सलमानच्या शोमध्ये कोणते नवे ट्विस्ट पाहायला मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button