Delhi News : उर्फी जावेद रुग्णालयात दाखल
चाहत्यांची चिंता वाढली
Delhi News : दिल्ली – नेहमी आपल्या हटके फॅशन आणि अनोख्या अंदाजामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण वेगळे असून यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. उर्फी जावेद रुग्णालयात दाखल झाली असून, तिने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील काही फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली. तिने इन्स्टाग्रामवरुन रुग्णालयातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या हाताला IV कॅन्युला लावलेले दिसत आहे. एका फोटोसोबत तिने ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ हे गाणे शेअर केले आहे, तर दुसऱ्या फोटोला ‘द बेस्ट पार्ट’ असे लिहिले आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
रुग्णालयाच्या बेडवरून शेअर केलेल्या एका फोटोत तिने ‘भाऊ, ॲनेस्थेसियाची स्वतःची मजा असते’ असे कॅप्शन दिले आहे. पोस्टमध्ये ॲनेस्थेसियाचा उल्लेख केल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे का, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्समधून तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi news
मात्र, उर्फीला नेमक्या कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबत तिने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे तिच्या रुग्णालयात दाखल होण्यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही.



