Mumbai News: दूधाचा दर नऊ रुपयांनी वाढणार
Mumbai News: मुंबई : मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे.
1 मिनिट वाचन

Mumbai News : एक सप्टेंबरपासून होणार नवीन दर लागू
Mumbai News: मुंबई : मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत दुधाचा घाऊक दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत.https://maharashtramirror.com/ Mumbai News,
मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादकांवर आर्थिक भार वाढत असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. पशुखाद्याच्या दरात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दाणा, तूरचुणी, चणाचुणी यांसह चारा, पेंड आदींच्या किमती वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
याशिवाय, एफडीएकडून भेसळयुक्त किंवा कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईनंतर शुद्ध दुधाची मागणी वाढल्याचेही संघाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरही दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
मुंबईत सध्या दूध किती रुपयांना मिळते?
मुंबईत दूधाच्या प्रकारानुसार सध्याचे दर वेगवेगळे आहेत. उपलब्ध ताज्या माहितीनुसार, मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या सुट्या म्हशीच्या दुधाचा घाऊक दर सध्या ९३ रुपये प्रतिलिटर आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये हा दर ९१ रुपयांवरून ९३ रुपये करण्यात आला होता. आता १ सप्टेंबरपासून तो १०२ रुपये होणार आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




