Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतरही CJPचा लढा सुरूच; रांका यांचा इशारा
Mumbai News : १० ऑक्टोबरला जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलनाची हाक; तीन मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही
Mumbai News : मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आता आपली पुढील रणनीती स्पष्ट केली आहे. केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा मिळवणे हेच आपले अंतिम ध्येय नसून, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतरही उर्वरित मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा CJPचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
रांका यांनी मंगळवारी रात्री सोशल मीडिया पोस्टद्वारे पक्षाच्या तीन प्रमुख मागण्यांची पुनरुच्चार केला. “ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतरही तिन्ही मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.CJPच्या मागण्यांमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबतचा आक्षेप आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल या मुद्द्यांचा समावेश आहे. पक्षाने निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुधारणा करण्याची मागणी केली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
दरम्यान, CJPने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आंदोलनानंतर पक्षाने ‘जंतर-मंतर २.०’ची हाक दिली असून, या आंदोलनासाठी देशभरातून कार्यकर्ते आणि समर्थक दिल्लीमध्ये दाखल होण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे १० ऑक्टोबरच्या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीपलीकडे जाऊन निवडणूक प्रक्रियेतील बदलांचा मुद्दा पुढे नेण्याची भूमिका CJPने घेतल्याचे रांका यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
