क्रीडा

Rajkot News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप

Rajkot News :राजकोट : भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या फलंदाजीची चमक दाखवली आहे. सौराष्ट्रकडून खेळताना जडेजाने छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावलं. राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात त्याने दुसऱ्या दिवशी 205 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीसह जडेजाने प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील 16 वं शतक आपल्या नावावर केलं.https://maharashtramirror.com/ Rajkot News
या सामन्यात रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा तो 72 धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवशी त्याने आपली लय कायम ठेवत शतक पूर्ण केलं. मात्र, 102 धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली. त्याने 209 चेंडूंचा सामना करताना सात चौकार मारले. धर्मेंद्रसिंह जडेजाने त्याला बाद केलं. विशेष म्हणजे, धर्मेंद्रसिंह यापूर्वी सौराष्ट्र संघाकडूनही खेळला आहे. वयाच्या 37 व्या वर्षी जडेजाने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीतील हे 16 वे शतक असून, त्यापैकी सहा शतके त्याने कसोटी क्रिकेटमध्ये झळकावली आहेत.

प्रेरक मांकडचंही शतक; सौराष्ट्रच्या 392 धावा


सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 392 धावा केल्या. संघाकडून प्रेरक मांकडने सर्वाधिक 129 धावांची खेळी केली. त्याने 150 चेंडूंचा सामना करताना 86 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. जडेजा आणि प्रेरक मांकड यांनी मिळून 205 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. एकवेळ सौराष्ट्रची धावसंख्या चार बाद 356 अशी मजबूत स्थितीत होती. मात्र, त्यानंतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सौराष्ट्रचा संपूर्ण डाव 392 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जडेजाची तयारी


भारतीय संघ आगामी काळात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेला 19 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत योगदान देण्याची क्षमता असलेल्या जडेजाने इंग्लंडविरुद्धही यापूर्वी महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. त्यामुळे रणजी ट्रॉफीतील त्याची ही शतकी खेळी आगामी कसोटी क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी ठरली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button