पुणेक्रीडापिंपरी चिंचवड

Pune News : युवा ऑलिम्पिकमध्ये तन्वी पात्रीची ऐतिहासिक कामगिरी; अंतिम फेरीत धडक

Pune News : जपानच्या युझुनो वातानाबेचा २१-१४, ११-२१, २१-१९ असा पराभव; महिला बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय

Pune News :पुणे : भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी पात्री हिने युवा ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जपानच्या युझुनो वातानाबे हिचा तीन गेममध्ये पराभव करत तन्वीने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या कामगिरीसह युवा ऑलिम्पिकच्या महिला बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तन्वीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या गेममध्ये तिने २१-१४ अशी बाजी मारत आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या गेममध्ये जपानच्या वातानाबेने जोरदार पुनरागमन करत २१-११ असा गेम जिंकला. त्यामुळे सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये पोहोचला.https://maharashtramirror.com/ Pune News

तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दबावाच्या क्षणी संयम राखत तन्वीने २१-१९ असा गेम जिंकला आणि सामना आपल्या नावावर केला. अशा प्रकारे तिने २१-१४, ११-२१, २१-१९ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयामुळे तन्वीने अंतिम फेरीत धडक मारली असून, आता तिच्याकडून सुवर्णपदकाच्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युवा ऑलिम्पिकमधील तिच्या या यशामुळे भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी अभिमानाची भर पडली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button