Vasai Robbery News : कंपन्यांमध्ये लोखंडे मालाची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरटयांना अटक

Vasai Steel Company Robbery News : कंपन्यांमध्ये लोखंडी मालाची जबरी चोरी करणा-या सागर राजाराम राजभर (रा. भोयदापाडा, वसई पूर्व) याच्यासह दोघांना वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
वसई :- वालीव पोलीस ठाण्याच्या Valiav Police Station हद्दीत असलेल्या शितल सुप्रीम इंडस्ट्रियल इस्टेट येथील ट्यूब इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये चोरी झाल्याची घटना 11 फेब्रुवारीच्या दरम्यान घडलेली होती. मागील काही दिवसांपासून वसई परिसरातील कंपनीच्या ठिकाणी लोखंडी बालाजी चोरीचे प्रमाण वाढले आहे. कंपनीतील चोरीमध्ये चोरट्यांनी तीन ब्रास रॉड समीर रफीक शेख उर्फ कालीमांग (रा. मुंब्रा) याच्यासह तिघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सायबान शेएब चावारे ( 39 वय) यांच्या शितल सुप्रिम इंडस्ट्रीयल इरस्ट येथील ट्युब फिट इंजीनिअरींग या कंपनीमध्ये व त्यांचे शेजारी असलेल्या संदीप कुमार तिवारी यांच्या अव्या इंजिनीअरींग कंपनीमध्ये 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी च्या दरम्यान चोरी झाल्याची घटना वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.अज्ञात चोरटयाने दोन्ही कंपन्यांचा मिळून 3 ब्रास रॉड व डाय मशीन असा एकुण 27 हजार रुपयांची चोरी झाली होती. पोलिसांनी घडलेल्या घटनेनंतर आरोपींच्या विरोधात कलम 331 (4),305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून वसई परिसरात कंपन्यांमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने वरिष्ठांनी चोरीच्या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. वालीव पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही च्या आधारे टेम्पो चालकाचा शोध घेतला तसेच या टेम्पोच्या माध्यमातून पोलिसांनी तीन आरोपींना शोधून काढले. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अशाच प्रकारे चोरी केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपींची नावे
1.सागर राजाराम राजभर (वय 26)
2.श्रीकृष्ण सुहास रावले उर्फ डी.जे (वय 34)
3.फैजू मोहम्मद इंद्रिस शहा (वय 18 पूर्ण)

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-2 वसई युनीटचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, पोलीस हवालदार मुकेश पवार, रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, पोलीस नाईक प्रशांतकुमार ठाकुर, पोलीस शिपाई अकिल सुतार,राहुल कर्पे,अनिल साबळे,प्रतिक गोडगे,राजकुमार गायकवाड, अजित मैड,अविनाश चौधरी, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेम-सायबर सेल, मि.भा.व. वि. पालीस आयुक्तालय यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.