Mumbai Crime News : विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून, ड्रोन, फटाके, पतंग उडवण्यास प्रतिबंध
•पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी 144 कलमांतर्गत दिले आदेश, 60 दिवसाच्या कालावधी करिता हे नियम लागू
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सतर्क म्हणून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारे दहशतवादी / राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायको लाइट एअरकापट पॅराग्लायडरचा वापर करून त्यांच्या हल्ल्यांमध्ये आणि त्याद्वारे व्हीव्हीआयपींना लक्ष्य करू शकतात. महत्त्वाच्या ठिकाणी किंवा व्हीआयपी लोकांना लक्ष करून सार्वजनिक जीवन धोक्यात आणण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून मुंबई पोलीस उप आयुक्त अकबर पठाण यांनी कलम 144 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांद्वारे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात, ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायको लाइट एअरकापट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून, इत्यादी च्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्याचे आदेश पुढील 30 दिवसांसाठी म्हणजे 22 मार्च 2024 ते 20 एप्रिल 2024 पर्यंत दिलं आहे.या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय असेल. Mumbai Crime News