क्राईम न्यूजमुंबई
Trending

Vasai Crime News : दरोडाच्या प्रकरणात चार वर्षे गुंगारा देणारा गजाआड, वसई गुन्हे शाखेची कारवाई

Vasai Latest Crime News : चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने वसई येथील वालीव पोलीस ठाण्याच्या परिसरातून अटक केली.

वसई :- चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने वालीव पोलीस ठाण्याच्या Valiav Police Station हद्दीतून अटक केली. आरोपीने क्षुल्लक कारणावरून जमावावर मारहाण केली होती. आणि त्यानंतर घराचा नुकसान करून शेजारील लोकांनाही मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराला चार वर्षांनी पोलिसांनी केली आहे.

काय घटना घडली होती?

दोन भाऊ रस्त्याने मोटार सायकल चरुन जात असतांना फिर्यादीशी वाद घालुन फिर्यादीचा लहान भाऊ व फिर्यादीचे वडील यांना ठोश्याबुक्याने मारहाण करुन थोड्या वेळाने फिर्यादी व फिर्यादीची आई व त्यांचे शेजारी राहणारा मुलगा असे त्यांचे घरात बसलेले असताना आरोपी यांनी हातामध्ये काठ्या, लोखंडी पाईप, लाकडी बांबु घेवुन येवुन फिर्यादीचे रुमचा दरवाजा, खिडकी तोडुन रुमचे आतमध्ये प्रवेश करुन फिर्यादी व त्यांच्या आईला मारहाण करुन घरामधील कपाट, एसी, व इतर सामानाची तसेच चाळीतील लोकांचे घराचे दार व खिडक्या व परीसरातील 8-10 वाहने हातामधील काठयाने, लोखंडी पाईप ने तोडफोड करुन फिर्यादीचे आईचा मोबाईल काढून घेवून चाळीतील इतर महीलांना मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी केल्याबाबत 26 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचा तपास करुन तपासात एकुण 17 आरोपींची नावे निषन्न करुन त्यातील 7 आरोपींना अटक करुन त्यांचे विरोधात वसई न्यायालयात दोषारोप सादर केले होते. बाकिचे आरोपींचे नाव-पत्ते अपूर्ण असल्याने नमुद अरोपींना गुन्हयात अटक करता आले नव्हते.

मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विविध गंभीर गुन्हयांतील पाहीजे व फरार निष्पन्न परंतु नजेराआड असणारे आरोपीत यांचा शोध घेवून अटक करण्याबाबत वरीष्ठांनी सुचना व मार्गदर्शन केले होते.

गुन्हयांचे फिर्यादी, साक्षीदार यांना भेटून त्यांचेशी घटनेबाबत सविस्तर चौकशी करुन गुन्हयाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेबाबत माहीती काढुन त्यांचेकडे चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे गुन्हयाचे तपासिक अधिकारी यांचेकडुन गुन्हयाचे तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडुन पाहीजे आरोपींबाबत मिळालेली माहीती यासर्वाचा गुन्हे प्रगटीकरणाचे कौशल्यपणाला लावून पाहीजे आरोपीतांचे नावाची उकल करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत गुन्हयातील पाहीजे आरोपींपैकी अविनाश श्रीनाथ गिरी नावाचे आरोपीचा संपूर्ण नाव पत्त्याबाबत माहीती प्राप्त करुन त्यास चार वर्षांनी म्हणजेच 11 फेब्रुवारी 2025 च्या दरम्यान अटक करण्यात आली आहे त्याला वालीव पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0