पुणे

Pune Road Closed : पुण्याच्या या मार्गावर प्रवेश असणार बंद

रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त वाहतुक वाहतूक व्यवस्थेबाबत दिले निर्देश

पुणे :- शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांचे संख्येमध्ये झालेली वाढ व त्या प्रमाणात रस्त्यांची न झालेली वाढ त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वाढलेली घनता, यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. तसेच विविध मोठे प्रकल्प (मेट्रो, उड्डाणपूल, विविध विकास कामे) सुरु असल्यामुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय होते.‌ त्याकरिता जनतेस पोहचणारा धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, वाहतूकी संदर्भात नव्याने आदेश निर्गमित करीत आहे. Pune Road Closed

पुणे शहरामधील पार्किंग जागेचा वापर माल वाहतुक करणा-या वाहनांनी लोडिंग / अनलोडींग केल्यामुळे व इतर वाहनांना पार्किंगला जागा उपलब्ध होत नसल्यामुळे, शहरामधिल अंतर्गत रस्त्यावर सर्व प्रकारच्या माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधुन साहित्यांची लोडिंग / अनलोडिंग करण्यासाठी (अत्यावश्यक सेवेतील वाहने, पब्लीक ट्रान्सपोर्ट बसेस, इत्यादी वगळून) तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिकतत्त्वावर खालील प्रमाणे नव्याने आदेश निर्गमीत करीत आहे. सदर ठिकाणी यापुर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द समजण्यात येतील. Pune Road Closed

23 मार्च रोजी पासून सकाळी 09.00 12.00 व 4.00- 9.00 वा. पर्यंत प्रवेश बंद असलेले रस्ते

1.लक्ष्मी रोड ;- संत कबीर चौक ते टिळक चौक

2.शिवाजी रोड :- स.गो. बर्वे चौक ते जेधे चौक

3.बाजीराव रोड :- पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक

4.केळकर रोड :- टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक

5.कुमठकर रोड :- टिळक चौकले शनिपार चौक

6.टिळक रोड :- टिळक चौक ते जेधे चौक

7.जंगली महाराज रोड :- स.गो. बर्वेचौक ते खंडोजीबाबा चौक ८. फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक

9.कर्वे रोड :- खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा

10.महात्मा गांधी रोड :- पंडोल अपार्टमेंट चौकतेडॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक

11.नॉर्थ मेन रोड :- कोरेगाव पार्क कोरेगाव पार्क जंक्शन ते लाडीगुत्ता चौक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0